झाडाची मोठी फांदी हायटेंशन वायरवर पडल्याने एमआयडीसी निवासी भागातील वीज पुरवठा खंडीत


कल्याण , प्रतिनिधी : आज सकाळी साडे दहा वाजता डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर तलावाजवळ झाडाची सुकलेली मोठी फांदी महावितरणच्या हायटेंशन वायरवर पडून मोठा कानठळ्या बसवणारा आवाज येऊन वीज पुरवठा खंडित झाला होता. या आवाजाने येथील रहिवाशांना मोठा आवाजाचा दणका बसला. काहींना हा आवाज एमआयडीसी मधील कंपनीचा स्फोट वाटला. 


           त्याचप्रमाणे या आवाजाने पक्षी घाबरूनओरडून आकाशात पळू लागले होते. खास करून कावळ्यांच्या जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. एकंदर या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याबाबत महावितरणला तातडीने कळविल्यानंतर कर्मचाऱ्यांनी येऊन सदर झाडाची फांदी हायटेंशन वायरपासुन बाजूला केली.


          काही दिवसांपूर्वीच महावितरणने निवासी भागात दोनदा मोठा शटडाऊन घेऊन हायटेन्शन वायरला लागणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या होत्या. परंतु त्यावेळी अनेक रहिवाशांनी त्यांचा घराजवळील फांद्या हायटेंशन वायरला लागत असल्याचा तक्रारी केल्या होत्या. येथील जागरूक महिला विधीशा जठार यांनी याबाबत लिखित व तोंडी पाठपुरावा महावितरण अधिकाऱ्यांकडे सतत केला होता. आजचा सकाळचा या घटनेमुळे  तासभर वीज पुरवठा बंद झाला होता. 


           त्यानंतरही अधून मधून वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे विद्याथ्र्यांचे व नोकरदारांचे ऑनलाईन कामे यात अडथळा निर्माण होत आहे. महावितरणने रहिवाशांचा तक्रारी नुसार कार्यवाही करावी अन्यथा अशा घटना पुन्हा होऊ शकतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments