डोंबिवली ( शंकर जाधव ) निळजे,लोढा,पलावा महोत्सवाचा उदघाटन माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव असणार आहे.महोत्सवात विविध प्रकारची मोठी ग्राहक बाजरापेठ,आकाश पाळणे,इत्यादी खेळण्यासाठी खेळणी या महोत्सवात उपलब्ध आहेत.महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागच्या कोव्हिडं काळात दोन वर्षात कोणत्याही प्रकारचा मोठा उत्सव झाला नव्हता.धर्मराज फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेला निळजे,लोढा,पलावा महोत्सव २०२१ हा विभागातील व परिसरातील नागरिकांना आनंददायी असाच ठरणार आहे. पहिल्या दिवशी प्रचंड प्रतिसाद या महोत्सवात दिसून आला. २१ तारखेपर्यंत चालणारा महोत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा असेल असे आयोजक महेंद्र पाटील यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी महोत्सवात 'संगीत संध्या'यातुन व सुश्राव्य गायनातून नागरिकांनी आनंद घेतला.महोत्सवाचे आयोजक महेंद्र पाटील यांच्याकडून महोत्सवाचे योग्य असे सुनियोजन करून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर रंगमंचावरून चर्चा सत्र आणि आगरी कोळी नृत्य तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
पहिल्या दिवशीच्या महोत्सव उदघाटन प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण,लक्ष्मण पाटील कल्याण जिल्हा अध्यक्ष भाजपा (ओबीसी ), लक्ष्मण पाटील, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी,भालचंद्र बेडेकर,शशिकांत बेडेकर,रवी थोरवे,रवींद्र पाटील,अरुण पाटील,जयेंद्र पाटील,चंद्रकांत भोईर,चंद्रकांत शिंदे,केतन पाटील,सागर पाटील,महादेव लोखंडे,सतिश सिंग,जय गोरे सदाशिव गुंडाळ,विलास जाधव,अजित सिंग, मयुरेश चुरी,भानुदास पाटील,सागर मोहिते,सचिन तारी,गणेश भोईर,प्रकाश चौगुले,हेमंत राठोड,ई. कृष्णमूर्ती आदी महोत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.पुढील दिवसात राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी या महोत्सवास भेटी देणार अशी माहिती आयोजक पाटील दिली.
0 Comments