पवनविभागाच्या १९९६ च्या बॅचच्या वतीने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप

 


कल्याण , प्रतिनिधी : वनविभागाच्या १९९६ च्या बॅचच्या वतीने दुर्गम भागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून वनविभाग ठाणे (१९९६-बॅच) यांनी आपल्या सेवेला २५ वर्ष झाल्यानिमित्ताने म्हणजेच वनविभागातील सेवेचा रौप्यमहोत्सव निमित्ताने व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अतिशय दुर्गम ठिकाणी असलेल्या अनुदानित आश्रमशाळा वाल्हिवरेता. मुरबाड या शाळेतील आदिवासी मुलांना शालेय दफ्तर (बॅग) व खाऊचे वाटप करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा केला.


      कार्यक्रमासाठी वनविभाग ठाणे (१९९६-बॅच) चे वनपाल रविंद्र ठाकरेरामदास गोरलेसुधीर फडकेशरद कंटेसाहेबराव खरे, शिवाजी केदार उपस्थित होते. तसेच लोकसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. बी.एम. पवारसंचालक संजय केदारपो.पाटील मा.सरपंचवन समिती अध्यक्षशाळेचे मुख्याध्यापक,  अधीक्षकअधिक्षिका,शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments