श्रमजीवी संघटनेची तहसीलदार कार्यालयावर धडक

 कल्याण ,कुणाल म्हात्रे  : अनेक महिन्यांपासून शासनाच्या रेशनिंग दुकानावर निकृष्ठ दर्जाचे अन्न धान्य मिळत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेचे राजेश चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या तहसीलदार कार्यालयवर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात शेकडो पदाधिकारीकार्यकर्ते सहभागी झाले होते.


या समयी राजेश चन्ने आणि श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी बाळाराम भोईर यांच्या नेतृवाखाली जमलेल्या मोर्चेकर्यांना मोर्चातील प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात येऊन रेशनिंग दुकानावरील निकृष्ट दर्जाचा होत असलेल्या अन्न धान्याची चौकशी होऊन त्वरीत चांगल्या धान्यायाचा पुरवठा रेशनिंग दुकानांवर करण्यात यावा. आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यात यावीरस्ते सुस्थितीत करण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या.


या नंतर तहसील कार्यालयासमोर जमावबंदी मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी काही कार्यकर्त्यांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेउन त्यांना नंतर सोडून देण्यात आले.


Post a Comment

0 Comments