स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सर्वांच्या सहकार्याने साजरा व्हावा - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी


 कल्याण , प्रतिनिधी :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सर्वांच्या सहकार्याने साजरा व्हावा आणि शहरात  चैतन्याचे वातावरण निर्माण व्हावेकोविडमुळे सर्वत्र पसरलेली  मरगळ दुर व्हावीअसे उद्गार  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  विविध कार्यक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत.           या कार्यक्रम कल्याण डोंबिवली नगरीत जन मानसाच्या सहकार्याने राबविले जावेत या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार महापालिका भवनात विविध महाविदयालयाचे  प्राचार्य तसेच रोटरी  व अन्य एनजीओमहापालिका अधिकारी यांच्या समवेत संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  


 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कशाप्रकारे विविध उपक्रम राबविले जावेत याबाबत सदर बैठकीत उहापोह करण्यात आला. सर्वांनी मिळून ७५ हजार झाडे महापालिका क्षेत्रात लावावीत जेणे करुन त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविला जाईली,  असा विचार या बैठकीत पुढे आला. 


त्याचप्रमाणे रोटरी मार्फत ७५ दिव्यांगांना जयपूर फुट दिले जातीलशहरातील ७५ स्पॉट निवडून तेथे स्वच्छ कल्याणसुंदर कल्याण ही संकल्पना राबविली जाईल. महापालिका क्षेत्रातील ७५ हेरिटेज वास्तुंचे सुशोभिकरण करण्यात येईलविविध विषयात प्राविण्य मिळविलेल्या ७५  पेक्षा जास्त वयांच्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाईल  अशा विविध संकल्पना या बैठकीत पुढे आल्या. 

 


असे विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्व एनजीओ व महाविदयालयांनी या कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर तथा विभागप्रमुखजनसंपर्क संजय जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्तांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने  स्वातंत्र्याच्या   या अमृत महोत्सवी वर्षात कल्याण डोंबिवली शहराचा नक्कीच कायापालट झालेला दिसून येईलअसा आशावाद आयुक्तांनी या बैठकीत व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments