भारतीय संविधान लोकशाहीचा प्राण - सौ सीमाताई आठवले

■संविधान दिना निमित्त रिपब्लिकन महिला आघाडी तर्फे संविधान वाटप...


मुंबई दि. 26 - भारतीय संविधान हे लोकशाहीचा प्राण आहे.संविधान चिरायू होवो; संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकारा द्वारे महिलांच्या जीवनात क्रांती घडविली आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक नेत्या सौ.सीमाताई आठवले यांनी प्रतिपादन केले. 


            बांद्रा येथील संविधान निवासस्थानी संविधान दिना निमित्त रिपाइं महिला आघाडीतर्फे संविधान प्रस्ताविका चे सामूहिक वाचन आणि संविधान ग्रंथाचे मोफत वाटप सौ सीमाताई आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपाइं महिला आघाडी च्या मुंबई अध्यक्षा ऍड.अभयाताई सोनवणे; सौ.शिलाताई गांगुर्डे;  शकुंतला आठवले; संगीता आठवले; शशिकलाताई वाघमारे; उषाताई रामळू; संघमित्रा गायकवाड; आदी  अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. संविधान चिरायू होवो; आणि जय भीम च्या नाऱ्यानी संविधान परिसर दणाणून सोडण्यात आला.

Post a Comment

0 Comments