उन्नतीची सीरीज ए फंडिंग राउंडमध्ये रु. ६० कोटींची निधी उभारणी


मुंबई, ११ नोव्हेंबर २०२१ : उन्नती अ‍ॅग्री या फिनटेक क्षेत्रातील शेतकी सेवा प्लॅटफॉर्म असलेल्या कंपनीने सीरीज ए फंडिंग राउंडमध्ये इंकोफिन इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, नॅबव्हेंचर्स आणि ओरिओस यांजकडून रू. ६० कोटींची गुंतवणूक उभी केली आहे. उन्नती या नव्याने मिळालेल्या भांडवलाचा उपयोग आपल्या तांत्रिक पायाभूत घटकांची उभारणी करण्यासाठी आणि त्यांच्या युस्टोअरचे नेटवर्क विस्तारण्यासाठी करेल.

 

        उन्नती त्यांच्या शेतकरी आणि विक्रेत्यांसाठीच्या अ‍ॅपमध्ये शेतीतील रोगनिदान, कृषी क्षेत्रातील जीवनचक्राचे व्यवस्थापन, भागीदारांसाठी पुरवठा शृंखला व्यवस्थापन इ. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चालणा-या नवीन वैशिष्ट्यांची विस्तृत श्रेणी जोडून आपल्या तंत्रज्ञानयुक्त प्लॅटफॉर्मला अधिक सुधारत आहे. कंपनी एआय आणि मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म्समध्ये अधिकाधिक गुंतवणूक करत आहे, जेणेकरून शेतकरी आणि युस्टोअरमधील भागीदारांसाठी नवीन डिजिटल साधने उपलब्ध करून देता येऊ शकतील.


    उन्नतीचे संचालक आणि सह-संस्थापक अशोक प्रसाद म्हणाले की, "उन्नती तंत्रज्ञानयुक्त उपायांच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे आणि आमच्या किरकोळ विक्रेते भागीदारांचे आयुष्य अधिक सुकर करण्यासाठी वचनबद्ध आहे. शेतकर्‍यांना आणि किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी उन्नतीने बरीचशी कल्पक उत्पादने बाजारात आनली आहेत आणि आमच्या विकासाची आजपर्यंतची घोडदौड ही लक्षणीय राहिली आहे.


       आम्ही आमची सीरीज ए राउंड ऑफ फंडिंग उभी केली आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे आणि आमच्या प्रवासात इतके सन्माननीय गुंतवणूकदार आमच्या पाठीशी आहेत हे आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. आम्ही देशभरातील सर्व शेतकर्‍यांना ‘शेतोद्योजक’ बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत त्यांच्या शेतकी उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ करण्याच्या आमच्या अंतिम ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहणार आहोत.”


      आजपर्यंत उन्नतीने आपल्या २०००० पेक्षा अधिक युस्टोअरच्या जाळ्यामार्फत ३ लाखांपेक्षा अधिक शेतकर्‍यांना सेवा दिली आहे. त्यांनी शेती संबंधित मालाचे किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि इतर घटकांना डिजिटलीकृत करण्यावर भर दिलेला आहे. आपल्या भागीदारांच्या नेटवर्कमार्फत उन्नती प्लॅटफॉर्म शेतक-यांना डिजीटलीकृत सेवा प्रदान करते, ज्यातून त्यांच्या शेतीतील मिळकत वाढवण्यास मदत होते. मागील १२ महिन्यांमध्ये ते १५ पटीने वाढले असून त्या प्लॅटफॉर्मच्या वापरामध्ये झालेल्या वाढीचे हे लक्षण आहे.

Post a Comment

0 Comments