कल्याण , कुणाल म्हात्रे : मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी मंदिराच्या चौथर्यावर महापालिकेच्या "अ" प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या पथकाने बुधवारी तोडक कारवाई केल्याने मनपाच्या कारवाई विरोधात ग्रामस्थ, मनसे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला निवदेन देत "अ" प्रभाग सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या वर निलंबनाची कारवाईची मागणी केली.
यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, राज्य सचिव इरफान शेख, मनसे पदाधिकारी राहुल कोट, भाजपाचे देवानंद भोईर, शक्तिवान भोईर, मुन्ना रईस, मोहने ग्रामस्थ राम तरे, सुभाष पाटील, रमेश कोनकर, अटाळी ग्रामस्थ मारुती पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मोहने ग्रामस्थ, मनसेचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी यांनी कल्याण परिमंडळ ३चे उप आयुक्त, तसेच खडकपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना मोहने गावातील १००वर्षी पुर्वीच्या जुन्या गावदेवी मंदिरावर सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी तोडक कारवाई केल्याने ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच तोडक कारवाई प्रकरणी नोटीस न देता कारवाई चा बडगा उचलला कसा.
हेतू पुरस्कार कारवाई करीत स्थानिक नगरसेविकेला देखील अपमानित केले असल्याने राजेश सावंत यांचे निलबंन करण्यात यावे. तसेच मनपा प्रशासनाने मंदिराच्या कामात सहकार्य करावे, अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याने यास प्रशासन जबाबदार राहिल अशा अशायाचे निवदेन दिले आहे.
0 Comments