डोंबिवली ( शंकर जाधव ) मुंबईतील टिळक भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचा पदवाटप व पर्यावरण प्रेमींचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ,प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक उपस्थित होते.
यावेळी डोंबिवलीतील वर्षा शिखरे यांची महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधीही शिखरे यांना मिळाली.शिखरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments