वीज कंपनी सेवकांच्या पतसंस्थेतील मदन राऊळ सेवानिवृत्त
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्याखालील वीज कंपनी सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जिल्हा ठाणेकल्याणया पतसंस्थे मध्ये प्रभारी व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले संस्थेचे कर्मचारी मदन राऊळ हे पतसंस्थेच्या ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शनिवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला.


       पतसंस्थेच्या वतीने राऊळ यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व सन्मानचिन्ह ट्रॉफी व गौरव-पत्र प्रदान करण्यात आली प्रदान करताना पतसंस्थेचे अध्यक्ष कॉम्रेड राजेश अहिरे,  पतसंस्थेचे सल्लागार कॉम्रेड टीसी भोईरकॉम्रेड जे आर पाटील, नारायण पाटील,  दिलीप पाटीलपतसंस्थेचे माजी सल्लागार अशोक झोपेएम एस पाटीलकल्याण परिमंडळाचे सचिव संतोष चचाने व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.


         तसेच सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि त्यांच्या ३७ वर्षांचा कार्यकाल बघता त्यांनी पतसंस्थेला निस्वार्थइमानेइतबारे दिलेली सेवा त्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कामाचा गौरव केला व भावी आयुष्यासाठी त्यांना आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.       कार्यक्रमाच्या शेवटी कॉम्रेड औदुंबर कोकरे संस्थेचे सचिव यांच्या आईला २७ ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली त्याबद्दल सर्वांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व अध्यक्षांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन सतीश म्हात्रे संचालक यांनी केले.

Post a Comment

0 Comments