माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या स्मृतिनिमित्त गरजूंना साहित्य वाटप
कल्याण , प्रतिनिधी  : महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक दिवंगत अरविंद इनामदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंध व रिक्षाचालक यांना गरजू साहित्य वाटप करण्यात आले. अंध व्यक्ती यांचा ट्रस्टसाठी पाच हजार रुपये माजी पोलीस आयुक्त ठाणे भुजंगराव मोहितेपोलीस उपायुक्त संजय पाटीलअरुण जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडुन देण्यात आले. 


           या कार्यक्रमाला माजी आमदार प्रकाश भोईर प्रदेश सचिव इरफान शेखराजेश रुपवात, नगरसेवक वरुण पाटील, लोककल्याण प्रतिष्ठाचे सागर भालेकर,  उपशहर अध्यक्ष गणेश चौधरीयोगेश गव्हाणे, वाहतूक शहर अध्यक्ष महेश भोईर, विभागीय अध्यक्ष संतोष अमृते, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे व चेतन कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments