हौस म्हणून धावणाऱ्या डोंबिवली करांचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली क्रीडा संकुल येथे सकाळचा व्यायाम किंवा हाऊस म्हणून चालायला येणाऱ्या डोंबिवलीकरांचा रणर्स क्लोन या नावाचा ग्रुप श्री लक्ष्मण गुंडप यांनी तयार केला. त्यातील प्रत्येकाला हळूहळू धावण्यास प्रवृत्त करून त्यासाठी योग्य असे व्यायामाचे प्रकार त्यांना रोजच्या रोज शिकवले, या ग्रुप मध्ये लहान बालकांपासून सत्तर पंच्याहत्तरी गाठलेले डोंबिवलीकर सहभागी झाले, आणि हळूहळू चालणारे धावू लागले, धावता धावता त्यांच्यातील आत्मविश्वास श्री लक्ष्मण गुंडप यांनी वाढवला व त्यांना स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त केले.


              नुकत्याच इंदापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या हौशी चालणाऱ्या डोंबिवलीकर मंडळींनी धावण्याच्या स्पर्धेत भरघोस यश संपादन केले. दुसऱ्या महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम, 25/11/21व 27/11/21 रोजी इंदापूर (पुणे) येथे झालेल्या स्पर्धे मध्ये भाग घेऊन. रुंनर्स क्लान च्या ग्रुपमधल्या पांडुरंग घाडगे, मुकुंद कुलते,  विजय सकपाळ आणि प्रशांत पूजारी यांनी भरघोस यश मिळवित सोनेरी लूट केली. या सुवर्ण यशाबद्दल बद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने आज रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.              याच मैदानात ही सर्व मंडळी नियमित धावण्याचा सराव करतात. घाडगे यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य , कुळते यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य. विजय सकपाळ यांनी एक रौप्य व एक काष्य, प्रशांत पूजारी यांनी फोन रौप्य तर एक काष्य पदक पटकावले. विजय सकपाळ यांनी 2nd महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम, 25/11/21व 27/11/21 रोजी इंदापूर (पुणे) येथे झालेल्या स्पर्धे मध्ये भाग घेऊन 10000 mtrs  रनिंग मध्ये दुसरा येऊन  सिल्व्हर मेडल  आणि 1500 mtrs रनिंग मध्ये तिसरा येऊन  ब्रॉंझ मेडल मिळवले.


          पांडुरंग घाडगे, निवृत्त पोलिस अधिकारी वय वर्ष ६०, 2nd महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम, 25/11/21व 27/11/21 रोजी इंदापूर (पुणे) येथे झालेल्या स्पर्धे मध्ये भाग घेऊन. खालील इव्हेंट 10000mtrs व 1500mtrs मध्ये गोल्ड मेडल आणि 100 mtrs मध्ये ब्रॉंझ मेडल मिळवले. मुकुंद कुलथे , वय ५० पुढे 2nd महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम, 25/11/21व 27/11/21 रोजी इंदापूर (पुणे) येथे झालेल्या स्पर्धे मध्ये भाग घेऊन. 


           खालील इव्हेंट 200 mtrs व 800 mtrs मध्ये गोल्ड मेडल आणि 1500 mtrs मध्ये ब्रॉंझ मेडल मिळवले. प्रशांत पुजारी, (वय ३०) वर्ष यांनी2nd महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम, 25/11/21व 27/11/21 रोजी इंदापूर (पुणे) येथे झालेल्या स्पर्धे मध्ये भाग घेऊन इव्हेंट 10000 mtrs व 5000 mtrs,1500mtrs मध्ये दुसरा येऊन सिल्व्हर मेडल मिळवले.

Post a Comment

0 Comments