केडीएमसीने केलेल्या तोडक कारवाईचे बांधकाम गावदेवी मंदिराचेच मोहने ग्रामस्थ मंडळाचा दावा

      


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपाच्या "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी यांच्या पथकाने बुधवारी केलेल्या तोडक कारवाई ही मोहने गावदेवी मंदिराच्याच कामावर केली असल्याचे प्रसिद्धी पत्रक ग्रामस्थ मंडळ मोहोने (कोळीवाडा) यांच्या वतीने देण्यात आले आहे.    


मनपाने केलेल्या मोहोने गावदेवी मंदिर चौथर्याच्या तोडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एलगार पुकरला असुन बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास केडीएमसी "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांच्या अतिक्रमण ताफ्यातील गरूड आणि इतर ७ ते८ जण यांनी कोणतीही नोटीस अथवा पूर्व सुचना न देता अचनाक येऊन बांधकाम तोडण्याची कारवाई केली. 


कारवाई करत असताना त्या परिसरात राहणारे मुस्लिम बांधव तसेच नागरिकांनी आधिकार्याना मंदिराचे बांधकाम असल्याचे सांगत बांधकाम  न तोडण्याची विनंती केली. परंतु बांधकाम तोडण्यास आलेल्या आधिकार्यानी जाणीव पुर्वक मंदिराचे बांधकाम तोडले आहे.


 मात्र कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता मनपा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मंदिर  नसल्याचा निर्वाळा देण्यात येत आहे. तरी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन खातरजमा करावी ग्रामस्थ, गावदेवी भक्तांच्या तसेच नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम करू नये. तसेच प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांनी याप्रकरणी माफी मागणे आवश्यक आहे. 


जनभावनेचा आक्रोश उसळल्यास त्या़ची सर्वथा जबाबदारी मनपा प्रशसनाची असेल अशा आशायाचे पत्र ग्रामस्थ मंडळ मोहोने यांच्या वतीने अध्यक्ष  सुभाष पाटीलसरचिटणीस रमेश कोनकर यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.

Post a Comment

0 Comments