आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून नांदप गावाला बाकडे आणि डस्टबिनची भेट
कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतुन टिटवाळा येथील  नांदप गावासाठी लोखंडी बाकडे आणि कचरा टाकण्याचे डब्बे देण्यात आले आहेत. हे बाकडे नांदप गावातील हनुमान मंदिर, गावदेवी आई मंदिर, नांदप रिक्षा स्टॅण्ड येथे बसविण्यात आले. तसेच गावातील  जिल्हा परिषद शाळेस डस्टबिन देखील  देण्यात आले. नांदप गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते बेंच-डस्टबिन चे नांदप ग्रामपंचायतीस लोकार्पण केले गेले.


या वेळी सामाजिक कार्यकर्ते जयेश शेलार यांनी सांगितले की आमदार विश्वनाथ भोईर यांचं नांदप गावावर नितांत प्रेम असून गावातील पाणी प्रश्न लवकरात लवकर वर्णी लागणार आहे असं सांगितले. त्याच प्रमाणे गावातील जि. प शाळा ते हनुमान मंदिर  पर्यंत जो काँक्रे्टीकरण झालं आहे ते आमदारांच्या पत्रामुळे झालं आहे. 


महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते कधीच श्रेयवादाच्या भानगडीत पडत नाही. ते कामावर जास्त विश्वास ठेवतात. जनतेचं समाधान हेच आमचा ध्यास आहे. त्याच प्रमाणे २५/१५  योजने अंतर्गत मा. आमदार यांच्या माध्यमातून जवळ जवळ १ कोटी रुपया पर्यंतची काम लवकरात लवकर मंजूर होणार असल्याचेही जयेश शेलार यांनी सांगितले. दरम्यान ग्रामपंचायत 'नांदपयेथील ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments