राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी संवाद कडून वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप वनवासी संवादचा १७०० भगिनींशी संवाद
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : दिवाळीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वनवासी संवाद ने आयोजित केलेल्या वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आत्माराम (बाबा) जोशी यांनी १५ वर्षांपासून सुरू केलेल्या या उपक्रमात धसई मुरबाड जवळील वनवासी पाड्यात २३० वनवासी भगिनींना साडी व मिठाई भेट देण्यात आली. 


दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेनिमित्त १ साडी व मिठाईचा पुडा देण्याचा उपक्रम याही वर्षी वनवासी संवाद ने आयोजित केला होता. वीस गावातील जवळपास १७००  भगिनी याचा लाभ घेणार असून त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला जाणार आहे.  यंदा या उपक्रमाची सुरुवात धसई जवळील वनवासी पाड्यात करण्यात आली. या उपक्रमाला यंदा जैन अलर्ट ग्रुप कल्याणदि कल्याण जनता सहकारी बँक कर्मचारी संघ कल्याणश्री सद्गुरू एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट मुंबईभारत विकास परिषद कल्याण शाखा तसेच चव्हाण फाउंडेशन कल्याण यांचे सहकार्य लाभले.


या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत,वैभव गुडे,सतिश शिंगोळे,निलेश रेवगडे तसेच छत्रपती शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयातील ठाकूर देसाई ,जगदीश फोगेटेझावरे व शिंदे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पुढील आठवड्यात शहापुर तालुक्यातील लाखाची वाडीमधली वाडीरानवीरजांबुळ वाढ निभळपाडा. कामतबाडीखोकरे वाडीपाचघरचाफ्याची वाडीभिवंडी तालुक्यातील देवराईदेवचोळेसागावकसारा जवळील तीन वाडया आदी ठिकाणीही वनवासी भगिनींना साडी व मिठाई वाटण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments