भिवंडीत उच्चभ्रू अंबिका सिटीच्या हलगर्जीपणा मुळे आठव्या मजल्या वरून पडून विकासक अभियंत्याचा जागीच मृत्यू नातेवाईकांचा आरोप

 


भिवंडी दि 21(प्रतिनिधी ) तालुक्यातील बोरपाडा परिसरात अंबिका सिटी तयार करण्यात येत असून इमारत उभारण्याच काम सुरू आहे . मात्र विकासकाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्यात न आल्यामुळे तसेच हलगर्जीपणामुळे या इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन साईड अभियंता खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . मोहम्मद आमीन मोहम्मद मुस्‍तकीम अन्सारी वय 27 वर्ष असे मयत साईड अभियंताचे नाव आहे . 


          भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर अनुप करनानी यांच्या वतीने उच्चभ्रू अंबिका सिटी सोसायटी बनवण्यात येत असून या अंबिका सिटीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिल्म अभिनेता संजय कपूर यांची उपस्थिती देखील पहायला मिळाली होती . मागील 5 वर्षांपासून या ठिकाणी इमारत तयार करण्याचे काम सुरू आहे  याच प्रोजेक्टमध्ये अभियंता मोहम्मद आमीन मोहम्मद मुस्‍तकीम अन्सारी वय 27 वर्ष असून आज दुपारच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावर पाहणी करत असताना तोल जाऊन  खाली पडल्याने साईड अभियंत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


            विशेष म्हणजे मयताच्या वडिलांनी विकासकावर हलगर्जीपणाचा आरोप लावला असून याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची काळजी न घेण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे त्यामुळे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच जोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली जात नाही तोपर्यंत हे काम बंद करावे अन्यथा इतरांचेही जीव जाण्याची दाट शक्यता आहे . 


           सध्या मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत त्याच प्रमाणे आत्ताच इमारतीचे काम सुरु असताना अभियंत्याची काळजी विकासकाला घेता येत नसताना भविष्यात राहण्यासाठी येणाऱ्या रहिवाशी यांची काळजी विकासक कशी घेईल असा सवाल विचारण्यात येत आहे..

Post a Comment

0 Comments