श्री मयूरेश संस्थेची आदिवासी बांधवां सोबत दिवाळी
कल्याण , प्रतिनिधी  : श्री मयूरेश कल्याण  या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात गेली ४० वर्ष कार्य  करणाऱ्या संस्थे तर्फे दरवर्षी आजी आजोबां सोबत दिवाळी हा उपक्रम  राबविण्यात येत असतो. आजवर अनेक  वृध्दाश्रमांत जाऊन  तेथील आजी आजोबांचे चेह-या वरील आनंद व्दिगूनित करण्याचे काम संस्थेच्या वतिने करण्यात येते असे संस्थेचे प्रमुख  भिकू बारस्कर यांनी सांगितले.


यावर्षी मात्र दिवाळीचा हा उपक्रम वृध्दाश्रमात न करता बदलापूर जवळील आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांबरोबर  करण्याण आला. बादलापूर येथील इंदिरा वृध्दाश्रमाच्या संचालक भारती पोतदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कल्याण येथून  संस्थेचे  कार्यकर्ते  या आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ,मिठाई,अन्नधान्य कपडे व इतर साहित्य घेऊन गेले. त्याचे वाटप करून मुलांना खाऊ व फटाके देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांच्या  सोबत दिवाळी साजरी केली. 


संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सळवी, आशा जोशी, अरविंद शिंपी, डॉअमिता कुकडे, समृद्धी देशपांडे, हेमू नायर, सुरेखा गावंडे यांनी आदिवासी बांधवांबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या चेह-वरचा आनंद हाण्यासारखा होता. आमच्या सोबत येऊन आमच्या मुलाबाळां सोबत आपण दिवाळी साजरी केलीत याचा आम्हांला खूपच आनंद झाला. 


आपल्या भेटवस्तूं पेक्षा  आपला आपलेपणा आमच्यासाठी फारच मोलाचा आहे असे स्थानिक आदिवासी भगिनी लक्ष्मी पावटा यांनी सांगितले. श्री मयूरेश कल्याण या संस्थेच्या या समाजपयोगी कार्यास अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभते. त्यात शिरीष  जोशी, प्रशांत कल्याणकर, चेतन मुळे, सुनील जोशी याचा मोलाचा सहभाग असतो.

Post a Comment

0 Comments