धक्कादायक ! अल्पवयीन गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये राडा; एकाच्या मांडीत खुपसला चाकू


भिवंडी दि 16 (प्रतिनिधी ) :  अल्पवयीन गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन चार मुलांमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे जोरदार राडा सुरु  असतानाच एका १४ वर्षीय  अल्पवयीन मुलाने  खिशातून चाकू काढून तो १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मांडीत खुपसल्याने गंभीर जखमी झाला आहे. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी १६ वर्षीय गंभीर जखमी मुलाने एक १४ आणि दोन १७ वर्षाच्या  हल्लेखोर अल्पवयीन मुलांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

तिन्ही  हल्लेखोर  अल्पवयीन मुल फरार ..


             भिवंडी शहरातील हिंदुस्थानी मजीद लगत असलेल्या मूकरिशा चाळीत जखमी मुलगा कुटूंबासह राहून शिक्षण घेत आहे.  तर त्याच परिसरात तिन्ही हल्लेखोर अल्पवयीन मुलं राहत असून काही दिवसापासून या अल्पवयीन मूलांमध्ये जखमी मुलाची  मैत्रणी   असलेल्या  अल्पवयीन मुलीवरून वाद होता. त्यातच  काल रात्री साडे दहाच्या सुमारास पुन्हा अल्पवयीन गर्लफ्रेंडवरून भिवंडीतील  ईदगाह रोडवर वादा होऊन हाणामारी सुरु होती. 


             त्यावेळी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा हाणामारी सोडविण्यासाठी गेला असता, त्याला बेदम मारहाण करून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या मांडीत चाकू भोसकला होता. यामुळे तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर फरार असलेल्या तिन्ही  हल्लेखोर  अल्पवयीन मुलांचा शोध भोईवाडा पोलिसांनी सुरु केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.  एस.  मागाडे  करीत  आहेत. 

Post a Comment

0 Comments