फसव्या मोदी सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे – बी. एम. संदीप

कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेसच्या वतीने जनजागरण व सविधान जागर...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  मोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे अशा या फसव्या मोदी सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे असे मत बी. एम. संदीप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी बी. एम. संदीप यांनी व्यक्त केले. कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने जनजागरण अभियानाचे आयोजन दहागाव येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.  


          अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून संपूर्ण महाराष्ट्रात १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर जनजागरण अभियान अंतर्गत जनसंवाद व संविधान जागर कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जनजागरण व सविधान कार्यक्रम आयोजित केला आहे.


कार्यक्रमाची सुरुवात सविधानाचे पूजन करून करण्यात आली. यावेळी काकडपाडा पळसोली परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी बी. एम. संदीप यांनी सांगितले की, आठ वर्षात गँसइधनाचे भाव वाढतच चालले आहेत. मोदी सरकारने अदानी अंबानिचे करोडपती यांचे कर्ज माफ केले तर गरीबांना खाईत लोटले.


 बेरोजगारी वाढली आहेमोदी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंधरा लाख रूपये प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणारपरंतु एकही रुपये जमा झाले नाही. अशा या फसव्या मोदी सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे. आपण भारतीय घटनेचे संविधान वाचवले पाहिजेहि सर्वांची जबाबदारी आहे नाहीतर मोदी सरकार मनूस्मुती लादेल असे सांगितले.


दहागाव येथील जनजागरण व सविधान जागरला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी बी. एम. संदीप, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष कानाडे,  ठाणे  जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे, कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटेजिल्हा उपाध्यक्ष परशुराम पिंताबरेनवनाथ भोईरमहिला जिल्हा अध्यक्ष संजना मिश्रा, जिल्हा सरचिटणीस रवींद्र परटोलेसुर्यकांत भोईरउपाध्यक्ष किरण केणे,  महिला अध्यक्ष साधना धुमाळशहापूर तालुका अध्यक्ष महेश धानकेभिवंडी तालुका अध्यक्ष राकेश पाटीलसरपंच अरविंद मिरकुटेओबीसी सेल तालुका अध्यक्ष गुरुनाथ केणेमाजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटीलमाजी सभापती मंगल चौधरीपर्यावरण विभाग जिल्हा अध्यक्ष रामराम जोशी, अमोल सुरोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments