ठाणे जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील एम डी भोईर सरांचे निधन ,पत्रकार संजय भोईर यांना पितृशोक

  


भिवंडी  दि.23  (प्रतिनिधी  ) ठाणे व पालघर जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून शिक्षकी पैशातून सेवानिवृत्त झालेले समाजसेवक महादेव दुंदाजी तथा एम डी भोईर सर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 81 व्या वर्षी सोमवारी सायंकाळी उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली .त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे .भिवंडी शहरातील जेष्ठ पत्रकार संजय भोईर यांचे ते वडील होते .


           भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळ संस्थेत विद्यार्थीदशे पासून अण्णासाहेब जाधव यांच्या सानिध्यात आल्या पासून त्यांनी त्यांच्या सोबतीने ठाणे पालघर जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक कार्यात झोकून देत काम करीत शिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात करून प्राचार्य पदापर्यंत काम करीत असताना संस्थेच्या विश्वस्त व सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्य करीत असताना दलित समाजाला संघटित करण्यासाठी परिश्रम घेतले होते .


           एम डी भोईर यांच्या पार्थिवावर मंगळवारी कामतघर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी नगरसेवक मनोज काटेकर ,भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक संतोष शेट्टी ,अशोक भोसले ,पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नत्ती मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव,विश्वस्त मंडळ,माजी विद्यार्थी ,चर्मकार समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments