अभिनय कट्ट्यावर वुई आर फॉर युच्या आपला माणूस या मोहिमे अंतर्गत कोपरी आनंद नगर विभागातील सेवेकऱ्यांचा सन्मान


ठाणे , प्रतिनिधी :  वुई आर फॉर युच्या माध्यमातून किरण नाकती यांच्या अध्यक्षतेखाली "आपला माणूस " या मोहिमेअंतर्गत समाजातील  विविध घटकांतील सेवेकऱ्यांचा सन्मान केला जातो. मागील महिन्यात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सन्मान स्मशानभूमीत जाऊन करण्यात आला होता. तसेच रविवारी पाचशे एक क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर आनंद नगर विभागातील ३७ सेवेकऱ्यांचा "वुई आर फॉर यू सन्मान" हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


         या सर्व सेवेकऱ्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून लसीकरण मोहीम असो, कुणाला इस्पितळात दाखल करायचं असो किंवा इतर सर्व प्रकारच्या आपत्कालीन सेवा देण्याचं काम सातत्याने केलं.यात लसीकरण मोहिमेत मेहनत घेणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर डॉ समिधा गोरे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.सोबत त्यांच्या टीमकडून सुद्धा त्यांनी जेव्हा खूप कमी लोकं वैद्यकीय सेवा द्यायला तयार होते तेव्हा काम करून घेतलं. 


          त्यांचा सन्मान किरण नाकती यांनी केला. तसेच आनंद नगर विभागातील महादेव पवार यांनी या सर्व सेवा देत असताना पुढाकार घेऊन आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत या काळात मोलाचं कार्य केलं ,महादेव पवार यांचा सन्मान किरण नाकती यांनी माजी महापालिका अधिकारी वासु फणसे यांच्या तर्फे केला. हे लोकसेवेचं कार्य करत असताना आम्हाला प्रत्येक वेळी महापौर नरेश म्हस्के यांनी सहकार्य केले, त्यांच्यामुळेच आम्ही लसीकरण , हॉस्पिटलमधील रुग्णांचे प्रवेश व इतर विविध सेवा देऊ शकलो असे मत महादेव पवार यांनी व्यक्त केले. 


             या संपूर्ण टीममधील डॉ माज अन्सारी,सतिश हिंगे, प्रकाश गावकर,अशोक सोनावणे, राजेश खत्री, आशा भावसार, विनायक जगताप, सागर कांबळे, मनीषा मोहिते, अरुणा फुलपगारे, रमण बटवले, शशिकांत माळी, सुनील कदम, सचिन उतेकर , निलेश नलावडे, किशोर गोदिवले, सचिन वायदंडे, ओमकार गोगावले, आनंद शेडगे, बाबुराव घाग, गंगाराम नरे, सुनील मालुसरे, अजित कवे, दिलीप मालुसरे, महादेव पाटील, सोमनाथ पवार, महेश नाईक, निलेश मोरे, केदार दाभेकर, विष्णू साटम, किरण गायकवाड,अमोल जोशी, मंगेश पवार, दिनेश वडवले, शैलेश शेलार या सर्वांचा सन्मान करण्यात आला.


            प्रसंगी माजी शिक्षिका मनीषा रानडे, डॉ र म शेजवलकर यांच्या हस्ते सुद्धा पुरस्कार देण्यात आले. या वेळी संगीत कट्ट्याच्या गायक कलाकारांचा गाण्यांची मैफिल सुद्धा रंगली होती. गायक अनंत मुळे, संदीप गुप्ता, पांडुरंग कदम, विद्याधर अपशंकर, अंजली संत यांनी आपली गाणी सादर करून उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले. या कट्ट्याचे निवेदन शुभांगी भालेकर यांनी केले. वुई आर फॉर यू च्या या आमच्या  सेवाकार्यात लसीकरण असो किंवा इतर अनेक सेवा असो आनंद नगर मधील आमच्या सेवेकरी मित्रांचेसुद्धा आम्हाला नेहमीच सहकार्य लाभले. 


            असेच सेवेचे कार्य आपल्या समाजातील जास्तीत जास्त नागरिकांकडून होत राहो,असे मत अध्यक्ष किरण नाकती यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments