निवडणूक कार्ड हे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग : ट्रान्सजेंडर तमन्ना केणे कल्याणात ट्रान्सजेंडरच्या मतदान नोंदणीला सुरवात


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेत द्वारली गाव येथील गरिमा गृह याठिकाणी उप जिल्हाअधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किन्नर अस्मिता फाउंडेशन माध्यमातून ट्रान्सजेंडर यांची मतदार नोंदणीला शनिवारी सुरवात झाली असून १०० हून अधिक ट्रान्सजेंडरनी मतदान नोंदणीचा अर्ज दाखल झाले आहे. हे मतदार कार्ड आमची ओळख असून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग आहे असे किन्नर अस्मिता संस्थेच्या प्रोग्राम मॅनेजर तमन्ना केणे यांनी सांगितले.


        कल्याण पूर्वेत द्वारली गाव येथे ट्रान्सजेंडर यांच्यासाठी गरिमा गृह नावाचे शेलटर होम सुरू करण्यात आले आहे. येथे त्यांच्या साठी जेवणाची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेलटर होममध्ये योगा, स्किल डेव्हलपमेंट, काऊनसलिंग मेडिटेशन आदी उपक्रम देखील होतात. तसेच आरोग्याची काळजी घेतली जाते.ट्रान्सजेंडर यांच्या मतदार नोंदणीला कल्याणात पहिल्यांदाच सुरवात झाली आहे. शनिवारी १०० हून अधिक ट्रान्सजेंडरनी मतदान नोंदणीचा अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक कार्ड मिळणार असल्याने आम्हाला ओळख तर मिळेलच. त्याचबरोबर आधारकार्डपॅनकार्ड आदीसह इतर कागदपत्रे मिळण्यास मदत होईल. 


          असे दिलासादायक चित्र तिथे उपस्थित असलेल्या ट्रान्सजेंडर यांच्या चेहऱ्यावर दिसुन आले. कार्यक्रमावेळी किन्नर अस्मिता फाँऊडेशनचे प्रोग्राम मॅनेजर विनोद चव्हाणकल्याण डोंबिवली सहाय्यक आयुक्त "ड" प्रभाग सविता हिले, नायब तहसीलदार परदेशी आदी उपस्थित होते.


       जिल्हाअधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ट्रान्सजेंडर यांच्या मतदान यादीत नाव नोंदणीला सुरवात करण्यात आली असून यापुढे १३, १४, २७, २८ नोव्हेंबर २०२१ रोजी विशेष मतदान नोंदणी मोहीम होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त ट्रान्सजेंडरने आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मुरबाडचे उपविभागीय अधिकारी रोहित राजपूत यांनी केले आहे.


     "अस्मिता फाँऊडेशन् च्या अध्यक्षा नीता केणे यांनी प्रतिक्रिया दिली कीठाणे जिल्ह्यातील पहिला ट्रान्सजेंडर साठी मतदार नोंदणी ड्राव्ह ई निवडणूक आयोगाने घेत आम्हास देखील मतदार राजा म्हणून मतदान चा राष्ट्रीय हक्क प्राप्त होणार असल्याने निवडणूक आयोगाचे आम्ही ट्रान्सजेंडर आभार मानातो." 

Post a Comment

0 Comments