टोरंट विरोधात काॅग्रेसचे लाक्षणिक उपोषणठाणे , प्रतिनिधी  :  टोरंट कंपनीला महाराष्ट्र शासनाने काही अटीशर्तीनुसार वीज बील वसुलीचा ठेका देण्यात आला असून टोरंट कंपनी कडून गेल्या अनेक वर्षांपासून या अटीशर्तीची पायमल्ली होत असल्याचा आरोप करित काॅग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथील टोरंट कार्यालयासमोर "लाक्षणिक उपोषण" केले.


             याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,टोरंट कंपनीला महाराष्ट्र शासनाने काही अटीशर्तीनुसार काम दिले होते परंतु टोरंट कंपनी कडून या अटिंची पायमल्ली करण्यात येत आहे टोरंट कंपनी कडून जी अनधिकृत बांधकामे होतात त्यांना नियमांना हरताळ फासून त्वरित वीजपुरवठा करित आहेत मीटर रीडिंग मध्ये अनधिकृत बांधकामाधारकाना व सामान्य जनतेमध्ये भेदभाव केला जातोय.


            अनधिकृत बांधकाम करणाय-या सोबत संगनमत करून  शासकीय वीजेपोटी जो भरणा असतो तो भरला जात नाही,कळवा, मुंब्रा,दिवा येथील जुन्या रहिवाशांकडून  बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा आरोप करित त्यानी सागितले की,वास्तविक ग्राहकांना तक्रार निवारण केंद्र स्थापन करून त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे अपेक्षित असताना ग्राहकांना नीट वागणूक दिली नसल्याचे सांगितले, 


                 भिवंडी मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग-धंदे असल्या मुळेच टोरंट आणले गेले तर मालेगाव मध्ये रहिवाशी भाग असल्यामुळे टोरंटचा ठेका रद्द करण्यात आला होता अशी आठवन करून देत असताना दिवा- मुंब्रा हा ग्रामीण भाग असतानाही टोरंट का आणले गेले?असा सवाल केला एकीकडे दिवा मुब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात आकडे टाकून वीज वापरली जात असूनही त्यांच्यावर निर्बंध न आणता त्यांचा सर्व भार हा सामान्य ग्राहकांकडून वसूल करण्यात येत असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments