अनाधिकृत बांधकामा प्रश्नाबाबत समाजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन

■पिंडदान घालत आणि महापालिकेचे वर्षश्राद्ध करत केले अनोखे आंदोलन..

 

कल्याण, कुणाल  म्हात्रे   : अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि केडीएमसी अधीकाऱ्यांच्या विरोधात डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पिंडदान घालत आणि महापालिकेचे वर्षश्राद्ध करत अनोखे आंदोलन केले आहे.

 

डोंबिवली मधील सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे गेले वर्षाभर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या केडीएमसी अधिकाऱ्यांच्या विरोधात गेले वर्षभर लढा देत आहेत. मात्र आयुक्तांकडे अनधिकृत बांधकामाबाबत  वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाहीना केडीएमसीला अनधिकृत बांधकाम रोखण्यात यश आलं आहे. त्यामुळे अखेर आज ३६५ दिवस आंदोलनाचे पूर्ण होताच निंबाळकर यांनी पिंडदान करत, पालिकेचे वर्षश्राद्ध घातले आहे. तसेच आयुक्तांनी काढलेल्या आदेशाला कशी केराची टोपली दाखवली जाते हे देखील निंबाळकर यांनी सांगितले.आयुक्तांनी साधारण दोन महिन्यांपूर्वी प्रसार माध्यमांना सांगत आदेश काढले होते कीअनधिकृत बांधकामांना नळ जोडण्या दिल्या जाणार नाहीत. तसेच महावितरणला देखील पत्र दिले होते की अश्या बांधकामांना वीजपुरवठा देऊ नये. मात्र नळ जोडण्या दिल्या जातात आणि महावितरणचे अधिकारी सांगतात की आयुक्त आमचे मालक नाहीत असे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अनधिकृत बांधकामी आज देखिल सर्रास सुरू असल्याचे निंबाळकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर तरी केंडीएमसीचे आयुक्त आणि अधिकारी याकडे लक्ष घालणार का निंबाळकर यांना न्याय देणार का हे पाहावे लागेल.

Post a Comment

0 Comments