पत्रीपुला वरून कल्याणच्या दिशेने भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ

■पत्रीपुल परिसरात सिग्नल यंत्रणा बसविण्याची मनसेची पालिकेकडे मागणीपालिका प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा...


कल्याण,  कुणाल म्हात्रे  : कल्याणातील बहुचर्चित पत्रीपूल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवर्यात सापडला आहे. कल्याणच्या दिशेला येण्यासाठी  नव्याने उभारण्यात आलेल्या पत्रीपुला वरून भरधावपणे वाहन चालक आपली वाहने चालवीत असल्याने वारंवार अपघात घडत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. पत्री पुल परिसरात सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी मनसेचे उपशहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका प्रशासनाकडे याआधीच केली असून पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेने वेळीच या गंभीर प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.


        पालिका प्रशासनाने पालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठा मोठे प्रकल्प राबविण्यात येत असून शहरातील मुख्य रस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. पत्रीपुला वरून कल्याणच्या दिशेला येताना दुचाकी वाहनचालक आपली वाहने भरधाव चालवीत असतात.  सोमवारी असाच एक अपघात दुचाकीस्वाराचा  घडला. या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या वाहन चालकांला मनसेचे उपशहर संघटक रुपेश भोईर यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. 


         वारंवार घडणाऱ्या अपघाता मुळे पत्री पुलाच्या दोन्ही दिशेला सिग्नल यंत्रणा बसवावी या करिता रुपेश भोईर यांनी पालिका प्रशासनांकडे पत्र व्यवहार करून ही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे व पत्री पुलावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा  मनसे स्टाईलने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा रुपेश भोईर यांनी यावेळी दिला आहे.

Post a Comment

0 Comments