वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई १ लाख ४० हजारांचा नवसागर मिश्रित रसायन केले नष्ट


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण - मलंगगड रोडवरील वसार गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी हातभट्टी उध्वस्त केली आहे. एक लाख चाळीस हजार रुपयांचा नवसागर मिश्रित रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केला आहे. 


वसार, कुंभार्ली, कुशिवली परिसरातील डोंगराळ भागात गावठी व हातभट्या  दारू विक्रेते सक्रिय झाले आहेत. मलंगगड भाग हा गावठी दारू निर्मितीचा हॉट्सस्पॉट म्हणून ओळखला जातो म्हणून हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभाग पुन्हा एकदा या गावठी दारूच्या भट्या फोडण्याकडे वळले आहेत. दिवाळीच्या कालखंडात केलेल्या कारवाईच्या धडाक्यानंतर हि कारवाई ग्रामीण भागात थंडावली होती. आता पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा हाती घेतला असून दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


            दुसरीकडे नेवाळी परिसरातील वाढती गुन्हेगारी हा  चिंतेचा विषय झाला असताना नेवाळी मध्ये अप्पर पोलीस आयुक्तांच्या पथकाने कारवाई करत किराणा दुकानामधून
 विक्री होणारा मद्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार भोईर हे करत आहेत. 

Post a Comment

0 Comments