खासदार निधीतून पिसवली गावातील मुख्य रस्त्याचे लवकरच होणार काँक्रीटी करण


■खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते उपतालुका प्रमुख विलास भोईर यांच्या जनसंपर्क कार्यलयाचे उद्घाटन..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पिसवली गावातील मुख्य रस्त्याचे लवकरच खासदार निधीतून काँक्रीटीकरण होणार असल्याची ग्वाही शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील पिसवली गावामध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व मदतीसाठी पिसवली गावचे समाजसेवक व शिवसेना पक्षाचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख  विलास भोईर यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन  खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी गोपाळ लांडगे बोलत होते.


  याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेकल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईरमाजी नगरसेवक कैलास शिंदेनिलेश शिंदे,  हर्षवर्धन पालांडेमहेश गायकवाडसुनील वायलेपरिवहन सदस्य बंडू पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक खंत व्यक्त केली, कोरोनाच्या काळात विकासकामे संथगतीने सुरू होती परंतु आता पुन्हा विकासकामे जोमाने सुरु झाली असून विकासाची गंगा शिवसेनेच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पिसवली गावातील नागरिकांना दिवाळी भेट म्हणून पिसवलीतील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम लवकरात लवकर खासदार निधीतून सुरु होईल असे आश्वासन दिले.


दरम्यान पिसवली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरु केले असून शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त मदत केली जाईल असे शिवसेना उप तालुका प्रमुख विलास भोईर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments