कल्याण , कुणाल म्हात्रे : छठ पूजा हि व्यक्तिगत पूजा असून सार्वजनिक पूजा नव्हे असे मत डॉ. जे. पी. शुक्ला यांनी व्यक्त केले. दरवर्षी प्रमाणे यंदाही कल्याण पूर्वेतील पिसवली येथे जीआरसी हिंदी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये कुणाल पाटिल फाउंडेशन तर्फे छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्तर भारतीय समाजाचा पवित्र असा छटपूजा हा उत्सव मोठ्या आनंदाने व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी नगरसेवक कुणाल पाटील, समाजसेवक अनिल पाटील, नकुल भोईर, बबन चौबे, डॉ.जे.पी.शुक्ला, शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला व इतर मान्यवर उपस्थित होते.
सलग तीन दिवस कडक उपवास पाणी सुद्धा न घेता,तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याला नमन करत, चौथ्या दिवशी उगवतया सूर्याला पाण्यात उभे राहून नमन करने छठ पूजा करण्याची प्रथा आहे.प्रत्येक जण तलाव किंवा नदी किनारी येऊन प्रथा पार पडतात.एकाच वेळी प्रत्येक ठिकाणी गर्दी होत होती. गर्दी टाळण्यासाठी ठीक ठिकाणी कृत्रिम तलावची सोय करण्यात आली. कुणाल पाटिल फाउंडेशनच्या वतीने कोरोना नियमाचे पालन करीत छठ पूजा हा सण साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ जे. पी. शुक्ला यांनी छठ पूजा हि व्यक्तिगत पूजा असून सार्वजनिक नाही. नियम पाळून छठ पूजा साजरा करण्यात आली, शाळेच्या प्रांगणामध्ये फक्त १० कुटुंबाना प्रवेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments