रेल्वेच्या हद्दीतील कचरा पालिका उचलणार नाही..... पालिका देणार रेल्वे प्रशासनाला पत्र घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त कोकरे यांनी केली पाहणी...
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे फलाट क्र.१ वरील   रेल्वे पुलाखाली साचलेले  कचऱ्याला  मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती.रेल्वे प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने या ठिकाणी कचरा साठवला होता.मात्र आग लागल्याची माहिती मिळताच आग विझल्यावर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  सदर ठिकाणचा कचरा उचलला.

             बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सदर ठिकाणची पाहणी केली.यावेळी ठेकेदाराची ही जबाबदारी असून पालिका याठिकाणचा कचरा उचलणार नाही असे स्पष्ट केले.मात्र आगीच्या घटनेनंतर पालिकेने सुकचरा उचलल्याने रेल्वेचे ठेकेदार मे.रंजना एंटरप्राइजेसला ११ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

     
              उपायुक्त कोकरे यांनी दुपारी डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे फलाट क्र.१ वरील रेल्वे पुलाखालची पाहणी केली.या ठिकाणी साचलेला सुका कचरा पाहून उपायुक्त वैतागले.या ठिकाणचा कचरा उचलायचा नाही असे यावेळी कोकरे यांनी पालिकेच्या  कर्मचाऱ्यांना सांगितले. कचरा उचलल्यास तुमच्यावरही कारवाई होईल असे सांगीतले. रेल्वे हद्दीतील कचरा पालिका उचलणार नाही असे पत्र रेल्वे प्रशासनाला देणार असल्याची माहिती यावेळी उपायुक्त कोकरे यांनी दिली.           या ठिकाणी कचरा साठवलेबाबत डोंबिवली रेल्वे व्यवस्थापन कार्यालयाकडून फक्त  कागदी घोडे नाचवले जात आहेत.मात्र प्रत्यक्षात यावर कोणतीही ठोस कारवाई अथवा उपाय रेल्वे प्रशासनाकडून केली जात नसक्याचे दिसते.या ठिकाणची आग तत्काळ आटोक्यात आणण्यात आली.परंतु यापुढे अश्या घटना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी घेतली जाणार का असा प्रश्न प्रवाशीवर्गांकडून विचारला जात आहे.

Post a Comment

0 Comments