ठाणे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुरज अकॅडमीने पटकावले अंतिम विजेतेपद
कल्याण ,कुणाल  म्हात्रे  :  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ ठाणे जिल्हा अंतर्गत स्वर्गीय दिलीप कपोते फाउंडेशन व तायक्वांदो असोसिएशन ऑफ कल्याण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी जिल्हास्तरीय सिनियर तायक्वांदो स्पर्धा कल्याण येतील के एम अग्रवाल कॉलेज येथे संपन्न झाली. या स्पर्धेत बदलापूरच्या सुरज तायकांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले तर स्पार्टान्स अकादमीने उपविजेतेपद पटकावले तसेच ओम साई अकॅडमी ला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.


          या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यामधील 
२०० खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पालघर येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे ताईक्वांदो अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी सांगितले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी  प्रदेश काँग्रेस महासचिव ब्रिज दत्तप्रदेश काँग्रेस चिटणीस प्रकाश मुथाताईक्वांदो अध्यक्ष संदीप ओंबासे हे उपस्थित होते.         तर स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी  शिवसेना कल्याण जिल्हा युवा सेना प्रमुख दिपेश म्हात्रे, संपर्कप्रमुख रवी कपोतेभाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल सचिव अनिल पंडिततायक्वांदो सचिव रोहित जाधवस्पर्धा आयोजक कौशिक गरवालियास्वर्गीय दिलीप कपोते फाऊन्डेशनच्या अध्यक्षा व आयोजक कल्पना कपोतेजिल्हा पदाधिकारी रविंद्र गजरेआनंद पष्टेदीपक मालुसरेसुरेन्द्र कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments