७९ टक्के विद्यार्थ्यांना शाळे मधील व्यक्तिश: सेलिब्रेशन्सची आठवण आली: सर्व्हे
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२१ : बालदिनानिमित्त नुकतेच केलेल्या सर्व्हेच्या माध्यमातून ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग व्यासपीठाने निदर्शनास आणले आहे की विद्यार्थ्यांना शाळेमधील व्यक्तिश: सेलिब्रेशन्सची आठवण येत आहे. विद्यार्थी बालदिनासारखे क्षण साजरे करण्‍यासाठी त्यांचे मित्र व शिक्षकांना भेटण्‍यासाठी उत्सुक असल्याचे यातून निष्पन्न झाले आहे.


        भारताच्या भव्य सणासुदीच्या काळादरम्यान घरामधूनच शिक्षण सुरू झाल्यापासून ७९ टक्के विद्यार्थ्यांना व्यक्तिश: कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आठवण आली आहे. ५५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की वर्ष २०२१ च्या उत्तरार्धात शाळा पुन्हा सुरू झाल्यापासून त्यांच्या शाळांनी ऑन-ग्राउंड कार्यक्रम आयोजित केले आहेत. ते आगामी बालदिन साजरीकरणासाठी खूपच उत्सुक आहेत.


       बालदिन हा सर्वात लोकप्रिय व बहुप्रतिक्षित दिवस राहिला आहे, जेथे विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. ब्रेनली सर्व्हेमधून निदर्शनास आले की ७१ टक्के विद्यार्थ्यांना माहित आहे की बालदिन हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि मुलांचा अधिकार, काळजी व शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. म्हणूनच सर्वोत्तम प्रकटीकरण आहे की ५२ टक्के विद्यार्थी म्हणाले, त्यांच्या शाळा पुन्हा एकदा यंदा ऑन-ग्राउंड बालदिन साजरा करत आहेत.


  ब्रेनली येथील चीफ प्रॉडक्ट ऑफिसर राजेश ब्यासनी म्हणाले, "बालदिन हा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उत्‍साहवर्धक दिवस आहे. ते त्यांच्या नित्यक्रमामधून काहीसा ब्रेक घेतात. आमच्या नुकतेच करण्यात आलेल्या सर्व्हेमधून निदर्शनास आले की विद्यार्थी दीर्घकाळाच्या ब्रेकनंतर शाळेमध्ये पुन्हा परतले असल्यामुळे यंदाचा वर्षात उत्साह शिगेला पोहोचला आहे. 


        व्यक्तिश: सहभाग सामाजिक अध्ययनाचे महत्त्वपूर्ण पैलू आहे, जे वर्गामध्येच कार्यक्षमपणे मिळते. विद्यार्थी त्यांचे सहकारी मित्र व शिक्षकांसोबत व्यक्तिश: परस्परसंवादांसाठी उत्सुक आहेत. म्हणूनच संकरित मॉडेल भारतातील शिक्षणाचे भवितव्य म्हणून उदयास आले आहे."

Post a Comment

0 Comments