क्रिकेटच्या राष्ट्रीय दिव्यांग झोनल स्पर्धेत वेस्ट जोन विजयी


■कल्याण मधील कल्पेश गायकर आणि रविंद्र संते यांची चमकदार कामगिरी...


कल्याण, प्रतिनिधी  : क्रिकेटच्या राष्ट्रीय दिव्यांग झोनल स्पर्धेत वेस्ट जोन विजयी झाला असून कल्याण मधील कल्पेश गायकर आणि रविंद्र संते यांनी चमकदार कामगिरी केली आहे.


वाराणसी येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग झोनल स्पर्धेत अंतिम सामन्यात साउथ झोन विरुद्ध विक्रांत केनी याने ४ तसेच कल्याणच्या कल्पेश गायकर याने २ तर रविंद्र संते याने एक निर्धाव षटक टाकत ३  फलंदाज बाद केले. तसेच कल्पेश पाटील याने १ गड़ी बाद केला. या तिघांच्या भेदक गोलंदाजी समोर साउथ झोन संघ सर्वबाद ४२ धावा करु शकला. 


४३ धावांचा पाठलाग सलामीवीर रविंद्र पाटील आणि विक्रांत केनी याने सहज पार करत आपल्या वेस्ट जोन संघाला १० गड़ी राखत विजय मिळवुन दिला. स्पर्धेत रविंद्र संते याने मैन ऑफ़ दी सीरीज तसेच सर्वाधिक १३ फलंदाज बाद करत उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला.

Post a Comment

0 Comments