कल्याण, प्रतिनिधी : दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध रूढ़ि परंपरांचे दर्शन या दिवाळीत आपल्याला होत असते. अशाच प्रकारची एक परंपरा कल्याण नजिक असलेल्या गोळवली गावात पाहायला मिळाली. बलिप्रतिपदा चे ओचित्य साधुन कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वतीने गोवर्धन पूजा करण्यात आली.
वर्षभर शेतकरी ज्या गुरांच्या खांद्यावर आपल्या परिवाराचे ओझे टाकून पालनपोषण करतो त्या गुरांना दिवाळीत सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. अशाच प्रकारची गुरांची मिरवणूक गोळवली गावात काढण्यात आली. कुणाल पाटील, अनिल पाटील, मयूर पाटील यांनी आपल्या गुरांची मनोभावे पूजा केली. त्यानंतर या गुरांची संपूर्ण गोळवली गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीनंतर प्रथेनुसार बळीराजाच्या दिर्घआयुष्यासाठी त्यांना आगीवरून नेण्यात आले. पाटील कुटुंबिय आज देखील अशा प्रकारच्या परंपरा जपत असल्या बद्दल सर्व गावात कौतुक होत होते.
नगरसेवक कुणाल पाटील, उद्योगपती आणि समाजसेवक अनिल पाटील, मयूर पाटील आदिंसह पाटील कुटुंबिय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments