आदिवासी पाड्यावर बालक दिन साजरा

 


डोंबिवली ( शंकर जाधव  ) बदलापूर जवळील कारव गाव येथील दात्रीची वाडी येथील जिल्हा  परिषद शाळेत  बालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे शाळेला वॉटर प्युरफायर देण्यात आला. ज्यामुळे तेथील मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देता येईल.अशुद्ध पाण्याने रोगराई पसरते.


          सध्याच्या काळात तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे आणि हे लहान मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत त्यांना निरोगी आयुष्य मिळावे यासाठी हा एक प्रयत्न रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाऊनने केला.तसेच सुधाश्री तर्फे मुलांना बिस्किट्स तसेच मुलांना शालेय साहित्य दिवाळी फराळ आणि चॉकलेट्स देण्यात आली.


        यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाऊन चे प्रेसिडेंट जितेंद्र नेमाडे आणि  रोट्रियन डॉक्टर प्रिया जोशी,महादेव तामसे,गिरीश वलियारे,बळवंत जोशी,रोट्रॅक्टर अजिंक्य जोशी आणि सुधाश्री  संस्थापिका ॲड.माधुरी जोशी हजर होत्या.

Post a Comment

0 Comments