महागिरी, खारकर आळी, खारटन रोड परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची सचिन शिदे यांची मागणी


ठाणे , प्रतिनिधी  :  गेल्या काही महिन्यांपासून खारकर आळी,महागिरी,खारटन रोड परिसरातील घरांमध्ये व इमारतीत राहात असलेल्या नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शहर काॅग्रेसचे सरचिटणीस सचिन शिदे यांनी केली आहे.


           ठाणे शहर काॅग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे यानी आज ठाणे महापालिकेचे नगर अभियंता अर्जुन अहिरे यांची भेट घेऊन ठाणे शहरातील खारटन रोड,बाजारपेठ,महागिरी,खारकर आळीतील रहिवाशांच्या तक्रारी त्यांच्या निदर्शनास आणून देत मागील काही दिवसांपासून पासून या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे सांगितले या भागात कमी दाबाने पाणी येत असून कमी वेळातच पाणी येणे बंद होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.


           काही विभागात तर 15 मिनीटातच पाणी बंद होत असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी बोलताना नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी संबधीत अधिकारीना त्वरित लक्ष घालून पाहणी करण्याचे निर्देश दिले व लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी प्रभाग काॅग्रेस अध्यक्ष प्रविण खैरालिया,ब्लाॅक काँग्रेस सचिव साहिल सुर्यवंशी व अंकुश चिंडालिया उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments