ओजस सुर्वे रेड बुल कार्ट फाइट नॅशनल फायनल्‍स २०२१ चा विजेता

ओजस सुर्वेने अबू धाबी ग्रॅण्‍ड प्रिक्‍स थरार पाहण्‍यासाठी जिंकले यास मरिना सर्किटचे प्रतिष्ठित तिकिट हौशी गो कार्ट स्‍पर्धेच्‍या चौथ्‍या पर्वामध्‍ये ६ शहरांमधील ८०० हून अधिक उत्‍साहींचा सहभाग..

                 

मुंबई , २१ नोव्‍हेंबर २०२१: हैदराबादमधील शिकेन सर्किट, लिओनिया रिसॉर्ट येथे शनिवार ७ नोव्‍हेंबर २०२१ रोजी रेड बुल कार्ट फाइट २०२१ ची रोमहर्षक नॅशनल फायनल पाहायला मिळाली. अद्वितीय रेसिंग अनुभव आणि अद्वितीय हौशी गो कार्ट स्‍पर्धा असलेल्‍या रेड बुल कार्ट फाइटच्‍या चौथ्‍या पर्वामध्‍ये ६ शहरांमधील ८०० हून अधिक उत्‍साहींचा सहभाग दिसण्‍यात आला. मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्‍नई, बडोदा व गुरूग्राम या सहा शहरांमधील अव्‍वल ३ सहभागींनी शनिवार ७ नोव्‍हेंबर रोजी हैदराबादमधील नॅशनल फायनल्‍समध्‍ये सहभाग घेतला. 


           मुंबईकर ओजस सुर्वेने सर्वात जलद लॅप टाइमसह इतर प्रतिस्‍पर्धींना मागे टाकले आणि रेड बुल कार्ट फाइट चॅम्पियन ठरला. त्‍याला अबू धाबी ग्रॅण्‍ड प्रिक्‍स येथे एफ१ २०२१ सीझन-एण्‍डिंग रेस पाहण्‍याची संधी देखील मिळाली आहे. रेड बुल अॅथलीट आणि भारताची यंग रेसिंग सेन्‍सेशन मिरा एर्डा हैदराबादमधील शिकेन सर्किट येथे रेड बुल कार्ट फाइट नॅशनल फायनल्‍समध्‍ये रेसर्सचा उत्‍साह वाढवताना दिसण्‍यात आली. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर फॉर्म्‍युला ४ स्‍पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर रेड बुल अॅथलीट मिरा एर्डा म्‍हणाली, ''आज रोमहर्षक नॅशनल फायनल पाहताना खूपच प्रेरणादायी वाटले. 


          स्‍पर्धा केलेल्‍या सर्व फायनालिस्‍ट्सचे आणि विशेषत: रेड बुल कार्ट फाइटच्‍या चौथ्‍या पर्वाचा चॅम्पियन ठरलेल्‍या ओजस सुर्वेचे अभिनंदन. रेड बुलसोबतचा माझा सहयोग खास राहिला आहे आणि मी आम्‍हा रेसर्सना आवडणा-या गोष्‍टी करण्‍यास वाव देण्‍यासाठी ब्रॅण्‍डकडून साह्य घेते. रेड बुल कार्ट फाइट ही हौशी ड्रायव्‍हर्सना रेस करण्‍याची आणि धमाल, पण स्‍पर्धात्‍मक अनुभव घेण्‍याची संधी देणारी स्‍पर्धा आहे.'' रेड बुल कार्ट फाइट २०२१ नॅशनल फायनल्‍स विजेता ओजस सुर्वे म्‍हणाला, ''मला माझ्या विजयाचा खूप आनंद होत आहे.


          रेड बुल कार्ट फाइट २०२१ च्‍या नॅशनल फायनल्‍सचा विजेता ठरल्‍याने खूपच चांगले वाटत आहे. स्‍पर्धा खूपच अवघड होती, पण मला चांगले प्रदर्शन करत माझे सर्वोत्तम देण्‍याचा विश्‍वास होता. रेड बुल कार्ट फाइट हौशी रेसर्ससाठी उत्तम व्‍यासपीठ आहे. ही स्‍पर्धा प्रकाशझोतात येण्‍यास वाव देण्‍यासोबत अबू धाबी ग्रॅण्‍ड प्रिक्‍स पाहण्‍याची संधी देखील देते.''

Post a Comment

0 Comments