कल्याण , प्रतिनिधी : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवतावादी शिकवणूकीला अनुसरुन ‘आमच्या नसानसातून वाहते मानवीयता’ या उदात्त भावनेने प्रेरित होऊन संत निरंकारी सत्संग भवन, टेमघर पाडा, भिवंडी येथे रविवारी संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५३ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या शिबिरात संत निरंकारी रक्तपेढीने १४३ युनिट तर जे.जे. महानगर रक्तपेढी यांनी ११० युनिट रक्त संकलित केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाच्या स्थानिक प्रबंधकां व्यतिरिक्त सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, कल्याणचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे तसेच मंडळाच्या आजुबाजूच्या शाखांचे मुखी उपस्थित होते. नगरसेवक संजय म्हात्रे यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे स्थानिक मुखी सांबया पोतू, गायत्रीनगर शाखेचे मुखी रोहितलाल, ब्राह्मण आळी शाखेच्या मुखी सुनंदा तरे आणि भिवंडी युनिटचे संचालक जितेंद्र काबाडी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
0 Comments