दुसऱ्या शहरातील कचरा केडीमसीच्या प्रक्रिया केंद्रावर नागरिकांच्या करावर ठेकेदार ‘मोर’ मात्र दंडात्मक करवाईदवारे क्लीनचिट


कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र सुरू आहेत. मात्र बारावे या प्रक्रिया केंद्रावर बाहेरचा कचरा टाकला जात असलेली बाब बुधवारी उघड झाली. कचरा प्रकल्प कल्याण डोंबिवली महापालिकेचा असून पालिका हद्दीतील नागरिकांकडून काचाऱ्यासाठी जास्तीचे पैसे कर रूपाने  आकरण्यात येत आहेत. तर प्रकल्प पालिकेचा असून इतर ठिकाणचा कचरा आमच्या माथ्यावर कशाला असा सवाल नांगरीकांनी विचारला आहे. मात्र पालिकेच्या वतीने ठेकेदारवर दंडात्मक कारवाई करत क्लीनचिट दिली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.


       कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहिमे अंतर्गत आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करत उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येत आहे. एकीकडे कचऱ्यासाठी नागरिकांच्या करात ६०० रुपयांची भर घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे भिवंडी मधील प्लास्टिक कंपनीचा इंडस्ट्रीयल कचरा केडीमसीच्या कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी येत आहे. ही बाब सामाजिक कार्यकर्ते तथा बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी निदर्शनास आणली.


याबाबत पालिकेच्या घनकचरा उपयुक्त  कोकरे यांना विचारणा केली असता सांगितले कीआम्हाला या बाबत माहिती नव्हतहा कचऱ्याचा ट्रक भिवंडी येथून आला आहे. ही बाब आता उघडकीस आली आहे. या प्रकल्पातील ठेकेदारवर दंडात्मक कारवाई कारण्यासाठी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असालयाचे सांगितले.


दरम्यान बुधवारी कचरा प्रकल्पावरील ही बाब उघडिस झाली मात्र याआधी हा प्रकार किती दिवसांपासून सुरु होता, तसेच आणखी किती शहरातील कचरा या ठिकाणी टाकला गेला आहे याचा तपास महापालिकेने करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments