सनफिस्ट डार्क फॅन्टसीने या दिवाळीसाठी तयार केल्या रुचकर भेटवस्तू


■तोंडाला पाणी आणणाऱ्या या भेटी यंदाच्या दिवाळीतील गिफ्टिंग कॅटगरीमध्ये परिवर्तन घडवणार...


मुंबई - ०३ नोव्हेंबर २०२१ : देशातील, सेंटर-फिल्ड कुकीचे उद्गाते सनफिस्ट डार्क फॅन्टसी यंदाच्या दिवाळीसाठी डार्क फॅन्टसी एक्स्प्रेशन्स व डार्क फॅन्टसी चोको फिल्स फेस्टिव्ह पॅक सादर करण्यास सज्ज झाले आहेत. आपल्या आकर्षक भेटवस्तूंसाठी नावाजल्या गेलेल्या सनफिस्ट डार्क फॅन्टसीने यंदाच्या दिवाळीच्या सणासाठी चोको-फिल्ड इच्छापूर्ती करणारी भेटवस्तूंच्या पर्यायांची एक्स्क्लुसिव्ह प्रीमिअम रेंज सादर केली आहे. या उत्सवी हंगामात ग्राहकांच्या भेटवस्तूंच्या आवश्यकतांमधील अभिजाततेचा अंश वृद्धिंगत करतानाच थाटमाट दर्शविण्याच्या दृष्टीने या भेटवस्तू बारकाईने तयार करण्यात आल्या आहेत.


          डार्क फॅन्टसी एक्स्प्रेशन्स: चोको फिल्स, चोको नट फिल्स, कॉफी फिल्स आणि चोको क्रीम सँडविचच्या वैविध्यपूर्ण रुचकर संग्रहाचे खास या दिव्यांच्या सणासाठी पॅकेज करून तयार केलेली डार्क फॅन्टसी एक्स्प्रेशन्स प्रत्येक क्षण खास बनवतात. सेलिब्रेशन बॉक्समध्ये उपलब्ध असलेला ४०० ग्रॅमचा पॅक रु.२०० या किमतीत उपलब्ध आहे.


      डार्क फॅन्टसी चोको फिल्स फेस्टिव्ह पॅक: तुमच्या जीभेची भूक भागविणाऱ्या व समाधान देणाऱ्या, सिल्की-स्मूथ चॉकलेटला मध्यभागी ठेवून त्याला रुचकर, अचूकतेने बेक केलेल्या क्रस्टने मढविलेल्या सनफिस्ट डार्क फॅन्टसी चोको फिल्सच्या तोंडाला पाणी आणणाऱ्या चवीचा आनंद घ्या. सेलिब्रेशन बॉक्समध्ये उपलब्ध असलेला ६०० ग्रॅमचा पॅक रु.२८० या किमतीत उपलब्ध आहे.


        या खास पदार्थांच्या लाँचबद्दल माहिती देताना ITC लिमिटेडच्या फुड डिव्हिजनच्या बिस्किट्स व केक्स क्लस्टर विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अली हॅरिस शेरे म्हणाले, “दिवाळी हा देशातील सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे आणि हा सण संस्मरणीय व्हावा यासाठी सनफिस्ट प्रयत्नशील आहे. 


        अत्युत्कृष्ट चोको अनुभवासह ग्राहकांना समाधान देणाऱ्या चविष्ट खाद्यपदार्थांसाठी डार्क फॅन्टसी अनेक वर्षांपासून ओळखले जात आहे. आम्ही यंदाच्या वर्षासाठी दोन खास उत्सवी भेटवस्तू पर्याय तयार केले आहेत, ज्यातून रुबाब दिसून येतो - सिल्कि मोल्टन चॉकलेट ज्याला मोहक, रिच क्रस्ट शेलचे बाह्यावरण देण्यात आले आहे. या उत्सवी हंगामात प्रत्येकाला आनंद देण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.


         भारतातील प्रमुख शहरे, ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि ITC स्टोअरमधील आघाडीची महानगरे, प्रमुख शहरांमधील सर्व आधुनिक व सामान्य किराणा दुकानांमध्ये डार्क फॅन्टसी एक्स्प्रेशन्स आणि चोको फिल्स दिवाळी बॉक्सेस उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments