भिवंडीत घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग; आगीत घर जळून खाकभिवंडी दि 17  (प्रतिनिधी ) एका घरामध्ये शॉटसर्किट होऊन  आग लागल्याची  घटना घडताच आग विझविण्याचा प्रयत्न सुरु होते. मात्र या दरम्यान  घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन  भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावातील एका घरात घडली आहे. या भीषण आगीत घरातल्या सर्वच साहित्य जळून खाक झाल्याने संसाराची राख रांगोळी झाली आहे.  

 

 अचानक शॉटसर्किटमुळे  घराला  आग .. 

            भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावात सुरेश गोडे  हे कुटूंबासह राहतात. त्यातच आज सकाळी साडे दहाच्या सुमारास गोडे यांच्या घरात वीजपुरवठा सुरु असताना अचानक शॉटसर्किट होऊन आग लागली होती. आगीची घटना कुटूंबाला  माहिती  पढताच घरातून पळ काढला होता. तर गावकऱ्यांनी  आग विझविण्याचा प्रयत्न करीत  असतानाच    घरातील   गॅस लिकीज होऊन सिलेंडरचा स्फोट होऊन  घराला भीषण आग लागली होती. 

 

सुदैवाने कुठलीही जीवितहानी 

 
        कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या  अग्निशमक दलाच्या कार्यलयात आगीच्या घटनेची माहिती  मिळताच  घटनास्थळी १ गाडी दाखल होऊन अर्ध्यात  तासातच आग विझवली. मात्र तोपर्यत  भीषण आगीत संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले आहे.  सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली आहे. या घटनेची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments