जन स्वराज्य सेवा फाँऊडेशनच्या वतीने रायते परिसरातील वीटभट्टी कामागार कुटुंबीयांना कपडे वाटपकल्याण , प्रतिनिधी  : कल्याणातील जनस्वराज्य सेवा फाँऊडेशन समाजातील तळागाळातील, वंचित घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधलीकी जोपसत असुन रविवारी कल्याण ग्रामीण परिसरातील रायते आदिवासी पाड्यानजीक असलेल्या वीटभट्टी कामगाराची भेट घेत  वीटभट्टी कामगार कुटुंबातील महिलांना साडी वाटप, कपडे वाटप, चिमुकल्यासाठी खेळणी वाटप, जेवण वाटप करण्यात आले.


जन स्वराज्य सेवा फाउंडेशनही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला या क्षेत्रात कार्यरत आहे. पुढे ही असे कार्य करीत राहील,  असे या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी योगिता निकम,  सागर भोईर,  प्रशांत सकपाळ, चिंट्या सोनवणे, रेश्मा धुकटेनदीम शेख आदी उपस्थित होते. जनस्वराज्य फाँऊडेशन  संस्थने समाजातील गरीब  गरजू लोकांसाना मदतीचा हात देण्याचा वसा घेतला असुन   तळागाळातील सामाजासाठी योगदान देत सामाजिक बांधलीकी जपत आहे.

Post a Comment

0 Comments