डायमंड ड्रॉप्सची डेन्मार्कच्या अॅक्वा पोरिन सोबत भागीदारी

■भारतामध्ये क्रांतिकारी जल शुद्धीकरण उत्पादने लॉन्च केली ~

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२१ : डायमंड ड्रॉप्स या बेंगळुरूमधील रिसॉर्स एन्हायरोन्मेंटल इंजीनिअरिंग प्रा. लि.च्या उद्यमाने नवी दिल्लीमधील डॅनिश एम्बेसी येथे पेटण्टेड तंत्रज्ञान अॅक्वापोरिन इनसाइड® सादर केलेल्या डॅनिश अॅक्वापोरिनसोबत सहयेाग केला आहे. दि रॉयल डॅनिश एम्बेसी, नवी दिल्ली येथील अॅम्बेसेडन श्री. फ्रेडी स्वेन यांनी अधिकृतरित्या पिण्याच्या पाण्याच्या जलशुद्धीकरण उत्पादनांना लाँच केले आणि डेन्मार्क व भारतासाठी हा सहयोग 'महत्त्वपूर्ण' असल्याचे सांगितले.


         अॅक्वापोरिनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर होल्म जेनसेन यांनी सांगितले की, ही उत्पादने भारतातील ऊर्जा-आव्हान असलेल्या क्षेत्रांसाठी अत्यंत लाभदायी आहेत. या उत्पादनांना शुद्धीकरणासाठी वीजेची गरज भासत नाही आणि ते उत्तम चवदार व शुद्ध पाणी देतात.


       नोबेल पुरस्कार-प्राप्त संशोधनावर आधारित अॅक्वापोरिन इनसाइड® तंत्रज्ञान कीटकनाशके, विषाणू, जीवाणू आणि इतर अवांछित संयुगे काढून टाकण्यासाठी अॅक्वापोरिन्स, नैसर्गिक प्रथिनांचा वापर करते. हे तंत्रज्ञान प्रतिमिनिटाला उच्च आऊटपुट, उच्च वॉटर रिकव्हरी रेट आणि दीर्घकालीन कार्टिज टिकाऊपणासह शुद्ध, सुरक्षित व उत्तम चवदार पाण्याची निर्मिती करते. ऑक्टोबर २०११ मध्ये अॅक्वापोरिनमधील वैज्ञानिकांनी नासासोबत (सीए, यूएस) सहयोगाने अॅक्वापोरिन इनसाइड® तंत्रज्ञानासह त्यांची पहिली क्षेत्रीय चाचणी यशस्वीरित्या केली.


    अॅक्वापोरिनच्या ड्रिंकिंग वॉटर प्युरिफायर्सना अॅक्वापोरिन इनसाइड® तंत्रज्ञानाकडून अद्वितीय वैशिष्ट्ये मिळतात आणि ते दोन व्हर्जन्समध्ये येतात: झीरो व वन. झीरो वीजेशिवाय कार्य करते आणि पहिल्या मिनिटामध्ये ३ लिटर शुद्ध पाणी देते. वन पंपासह कार्य करते आणि सतत प्रतिमिनिट १.७५ लिटर शुद्ध पाणी निर्माण करते. भविष्यात अॅक्वापोरिन मॉड्युलर किचन्स व कॉर्पोरेट कार्यालयांसाठी देखील सोल्यूशन्स विकसित करेल.


         डायमंड ड्रॉप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश एचपी म्हणाले, "आपल्या पंतप्रधानांनी २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा दृष्टिकोन आखला आहे. या दृष्टिकोनांतर्गत भारत सरकारने अनेक देशांमध्ये सहयोग केला असताना सर्वात महत्त्वपूर्ण संघटन म्हणजे डेन्मार्कसोबतचा ग्रीन स्‍ट्रॅटेजिक पार्टनरशीप प्रोग्राम, जो प्रमुख समस्यांसोबत प्रामुख्याने वॉटर सोल्यूशन्सवर भर देतो."

Post a Comment

0 Comments