कल्याणात उलगडणार लोककवी वामनदादा कर्डक यांच्या आठवणींचा पट


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पू ल कट्टा कल्याण यांच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जन्म शताब्दी महोत्सव समिती मार्फत लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने समितीने वेगवेगळे कार्यक्रम राज्यभर आयोजित केलेले आहेत. त्यातीलच एक उपक्रम लोककवी वामनदादा कर्डक यांच्या सहवासात राहिलेले त्यांचे सहकारी तसेच त्यांनी लिहिलेली गाणी ज्यांनी गायली असे गायक हे वामनदादा यांच्या बद्दलच्या आठवणी कल्याणकरांना सांगणार आहेत.  रविवार दिनांक २८ नोव्हेंबर  रोजी सायं ५ वाजता मराठा समाज हॉलअत्रे नाट्यगृह समोर कल्याण पश्चिम येथे "उजाळा  महाकवीच्या आठवणींना"असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


 या कार्यक्रमात प्रा. दिलीप महालिंगेनाट्य अभ्यासक औरंगाबाद तसेच सिद्धार्थ मोरे माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य आणि शिंदेशाही फेम गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे हे आपल्या आठवणींना उजाळा देऊन वामनदादांच्या आठवणींचा पट उलगडणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य  चोख बजावणाऱ्या विविध व्यक्तीसंस्थायांचा सन्मानही करण्यात येणार आहे. तसेच लोककवी वामनदादा कर्डक यांचा पुतळा असलेल्या सन्मान चिन्हांचे उद्घाटन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.


 लोककवी वामनदादा कर्डक यांचा पुतळा असलेलं सन्मानचिन्ह महाराष्ट्रात प्रथमच पू ल कट्टा कल्याण वतीने करण्यात येत आहे ही विशेष बाब आहे. तरी साहित्य रसिकांनी व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या चाहत्यांनी वामनदादांच्या काही आठवणी, काही गाणी याचा आनंद घेण्यासाठी या कार्यक्रमास जरूर उपस्थित राहावे असे आवाहन पू ल कट्टा कल्याण यांच्या वतीने प्रा. प्रशांत मोरे, कार्याध्यक्ष व डॉ गिरीश लटके संघटक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments