दत्तनगर बॉईज मंडळाने बनवली ३२ फूट रुंद किल्ले विसापूर प्रतिकृती

 डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास आजच्या पिढीला माहीत होण्यासाठी सात वर्षापूर्वी दत्तनगर किल्ले परिवार अर्थात दत्तनगर बॉईज या मंडळाची स्थापना झाली. मंडळाचा महत्त्वाचा हेतू होता की दिवाळीत किल्ले बांधणे.  महाराष्ट्राला विसर पडलेल्या वेगवेळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती मंडळाने साकारण्यास सुरुवात केली. 


        गेल्यावर्षी २०  फूट रुंद अशी मल्हार गडाची प्रतिकृती साकारत मंडळाने युवा पिढीसाठी एक नवीन पायंडा पायंडा पाडला आहे.सध्या या वर्षी याच मंडळाने किल्ले विसापूरची आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी ३२ फूट रुंद प्रतिकृती साकारली आहे.


         किल्ले विसापूर प्रतिकृती प्रदर्शन व भव्य उद्घाटन सोहळा शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या हस्ते २ नोव्हेंबरला पार पडला. किल्ल्याची प्रतिकृती सर्वांना दत्तगर वसाहत मैदान दुर्गा माता मंदिर रोड शास्त्री हॉल मागे डोंबिवली पूर्व येथे पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments