एमजी कार क्लब इंडियाचा नर्गिस दत्त फाऊंडेशन सोबत सहयोग


मुंबई, १९ नोव्हेंबर २०२१ : वर्ल्ड काइण्डनेस डे निमित्त एमजी मोटर इंडियाने वर्ल्ड काइण्डनेस डेच्या निमिताने नर्गिस दत्त फाऊंडेशनसोबत सहयोगाने सामाजिक कार्याप्रती खास मोहिमेचे आयोजन केले. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी एमजी मोटर कार क्लब – इंडिया (एमजीसीसी-आय)च्या नवीन उपक्रमाला श्रीमती प्रिया दत्त (विश्वस्त - नर्गिस दत्त फाऊंडेशन) यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला.


      सामाजिक कार्याप्रती मोहिमेचा मुलींच्या शिक्षणाला चालना देत त्यांना पात्र असलेले सर्वोत्तम भविष्य देण्याचा मनसुबा होता. या उपक्रमाचा भाग म्हणून एमजी मोटर व एमजी डिलर मुंबई यांनी विद्यार्थीनींचे शिक्षण व इतर गरजांना पाठिंबा देण्यासाठी फाऊंडेशनला २.५ लाख रूपये दान केले आहेत.


     तसेच या कार्यक्रमाप्रसंगी फिक्‍की फ्लो मुंबईच्या अध्यक्ष ल्युबियाना शाहपूरवाला, फिक्की फ्लो मुंबईच्या खजिनदार आरमीन दोर्दी, फिक्की फ्लो मुंबईच्या सचिव खुशनुमा खान, एमजीसीसी-आय मुंबई अधिकारी श्रीमती अक्षिता, मोदी ग्रुपचे (डिलर भागीदार – एमजी मोटर इंडिया) व्यवस्थापकीय संचलाक श्री. गौतम मोदी, मोदी ग्रुपच्या (डिलर भागीदार – एमजी मोटर इंडिया) संचालक श्रीमती निधी मोदी आणि एमजी मोटर इंडियाचे विवेक धवन उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments