गौरी पाड्यातील हनुमान म्हात्रे यांचे निधन

   


कल्याण  : कल्याण पश्चिमेतील गौरीपाड्यातील स्थानिक भुमीपुत्र हनुमान सखाराम म्हात्रे यांचे नुकतेच आजारापणामुळे निधन झाले. गौरीपाड्यातील सर्वसामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायिकबिल्डर असा आपल्या मेहनत आणि कष्टाच्या जोरावर नावलौकीक कमाविलेले,  सामाजिककलाशैक्षणिकसांस्कृतिक क्रिडाधार्मिक क्षेत्रात योगदान असलेले हनुमान म्हात्रे यांचे वयाच्या ६५  वर्षी आजारपणामुळे निधन झाले.तळागळातील समाजातील वर्गासाठी मदतीचा हात देणारे असे त्यां चे व्यक्तीमत्व होते. समाजातील सर्वच स्तरातील वर्गातून त्यांच्या दुख:द् निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.  दशक्रिया विधीचा क्रार्यक्रम  शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३०वा. श्री क्षेत्र सिध्देश्वर मंदिर पाचवा मैल कांबा येथे होणार असुन सोमवार ६ डिसेंबर रोजी उत्तर कार्य  सकाळी १० ते १२ वेळात  संपन्न होणार आहे. त्यांच्या पश्चात  पत्नी१ मुलगीएक भाऊ , २ पुतणे सुनानांतवडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments