डंपिंग ग्राऊंडची खाडी लगतची संरक्षक भिंत कोसळल्याने कचरा मिळसतोय खाडीत खाडीच्या पाण्याचे प्रदूषण वाढण्याचा धोका


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडची खाडी लगतची संरक्षक भिंत कोसळली आहे. गेली काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या या भिंतीकडे मनपाचे दुर्लक्ष झाले असल्याने त्यामुळे कचऱ्याचा ढिगारा आत्ता खाडीच्या पाण्यात मिसळून खाडीचे पाणी दूषित होत आहे.


 कल्याण डोंबीवली मनपाने आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद केले होते. अतिवृष्टीचा फटका  महापालिकेच्या उंबर्डे आणि बारावे कचरा प्रकल्पांनाही बसला. त्यामुळे आधारवाडी येथे बंद करण्यात आलेला कचरा पुन्हा त्याठीकाणी कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत डोंबिवलीतील ओला कचरा प्रक्रियेसाठी आधारवाडी डंपिंगवर आणला जात आहे. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडची खाडी लगत असलेली संरक्षक भिंत होती.


 डम्पिंग कचरा खाडीत येऊ नये यासाठी ही संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी ही भिंत कोसळली या ठिकाणचा रस्ता देखील खचला. भिंत कोसळून काही महिन्यांचा कालावधी उलटला मात्र पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे . त्यामुळे कचऱ्याचा ढिगारा खाली कोसळून तो थेट कल्याणच्या खाडी मिसळतोय.


पाणथळखाडीनदी किनारी डंपिंग ग्राऊंड असू नये असे पर्यावरणाचे नियम आहेत. डंपिंग ग्राऊंड बंद झाल्याने खाडीचे प्रदूषणही कमी झाले होते. कोरोना काळातही प्रदूषण कमी असल्याने खाडी प्रदूषणमुक्त होण्यास मदत होत होती. आत्ता डंपिंगचा कचरा खाडीत मिसळल्याने खाडीचे पाणी प्रदूषित होत आहे. खाडीच्या पाण्यालाही दुर्गंधी येऊ लागली असा आरोप नागरिकांकडुन होत आहे.  

                      

"यासंदर्भात घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडे संपर्क साधला असता संदर्भीत डपिंग ग्राऊंडच्या खाडी लगत खाडीत कचरा मिसळु नये याकरिता १० वर्षोपुर्वी संरक्षक भिंत बांधली होती. खाडी लगत दलदल असल्याने भिंत खचली असावी. सरंक्षक भिंतची दुरूस्ती करण्यात येणार असुन लगतच्या नाल्यात खाडीच्या परिसरात नाल्यातील कचरा खाडीत जाऊ नये म्हणून लोखंडी जाळी बसविणार असल्याचे सांगितले."

Post a Comment

0 Comments