भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि भारताच्या सर्व प्रकारचा विकास , प्रगती मध्ये पंडित नेहरू यांचे योगदान फार महत्त्वाचे.... सभागृह नेते विकास निकम
भिवंडी दि 14 (प्रतिनिधी )भारतीय स्वातंत्र्याचा आपण यावर्षी अमृत महोत्सव साजरा करीत आहोत.अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्य चळवळीतील सर्व  स्वातंत्र्यसैनिक यांचे  योगदान महत्त्वाचे आहे. 


           सामान्यातल्या सामान्य स्वातंत्र्यसैनिक याचे कार्य देखील यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, पण पंडित पंडित नेहरू यांनी महात्मा गांधींच्या बरोबरीने स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले, सर्व प्रकारच सत्याग्रह, आंदोलन, 1942 चे भारत छोडो आंदोलन, चले जाव चळवळ या सर्वात पंडित नेहरू यांचे योगदान महत्वाचे आहे, त्याबद्दल अनेक वेळा त्यांना कारावास देखील भोगलेला आहे. 


         स्वातंत्र्य चळवळीत जशी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे तसेच  स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासात भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून विविध क्षेत्रातील संपूर्ण  देशाच्या  विकासाचा पाया देखील त्यांनी रोवला आहे,  म्हणुनच त्यांना भारत आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हटले जाते.          पंडित नेहरू देशाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे असे उद्गार पालिका सभागृह नेते विकास निकम यांनी काढले. पंडित नेहरू जयंती निमित्ताने  पालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सभागृहनेते निकम बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सभागृहनेते विकास निकम यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


            यावेळेला मुख्यालयाचे उपायुक्त दीपक पुजारी, प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त दिलीप खाने, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, बांधकाम कार्यालय अधीक्षक किशोर भदाणे, राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेचे विभाग प्रमुख कैलास पाटील,  लेखा विभागातील प्रकाश मात्रे इत्यादी उपस्थित होते. 


             यावेळी मुखालय उपआयुक्त दीपक पुजारी म्हणाले की, पंडित नेहरू यांच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर काळात केलेले कार्य  महत्वाचे आहे,  भारताच्या विकासात कृषी, उद्योग, तंत्रज्ञान, विज्ञान संशोधन या क्षेत्रात त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या, पंडित  नेहरूंचे योगदान महत्त्वाचे आहे,असे उपायुक्त यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments