कॉंग्रेसच्या ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष पदी जयदीप सानप यांची नियुक्ती

■कोणताही वारसा नसताना एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती...


कल्याण , प्रतिनिधी  : कॉंग्रेसच्या ओबीसी विभाग जिल्हाध्यक्षपदी कल्याण मधील जयदीप सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, माजी मंत्री प्रदेश उपध्यक्ष दिलीप पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत सानप यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदी लखपतसिंह राजपूतप्रदेश सरचिटणीस पदी संगीता भोईरप्रदेश सदस्यपदी अरुण घोडे आणि भालचंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जयदीप सानप हे गेल्या २५ वर्षापासून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कोणताही वारसा नसताना एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाली आहे. आता पर्यंत त्यांनी युवक काँग्रेससेवादल काँग्रेसब्लॉक काँग्रेस या पदावर कार्य केले असून त्यांनी कल्याण शहरातील अनेक प्रमुख विषयांचे पाठपुरावे केले आहेत. 


 माहिती अधिकारातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड असून अन्याय विरुद्ध आक्रमक लढतात. तसेच पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करून पक्षाचे आंदोलन असो किंवा लोकसभा, विधानसभा, नगरसेवक निवडणूक यात पक्षाने दिलेल्या प्रत्येक उमेदवाराचे काम केले आहे.


गेल्या २ वर्षापासून कल्याण शहर या पदावर कार्यरत होते पक्षाने त्यांच्या उत्तम कार्याची प्रामाणिक पणाची दखल घेत त्यांना बढोतरी देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ओबीसी विभाग कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजा जाधव, पर्यावरण अध्यक्ष रीना खांडेकरविद्या चव्हाण, विनोद शिंपीरियाज सय्यदविनायक सानप, सुमित जाधवगणेश  आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान पक्षाने दिलेली जवाबदारी योग्य रीतीने पार पाडून पक्ष संघटना वाढीसाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार असून, आगामी केडीएमसी निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया जयदीप सानप यांनी दिली.

Post a Comment

0 Comments