"हर घर दस्तक"या मोहिमेने केडीएमसी क्षेत्रात ओलांडला ४५ हजार लसीकरणाचा टप्पा


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात आत्तापर्यंत ९ लाख २१ हजार ८८९ नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घेतला असून एकूण ५ लाख २६ हजार ४६२  नागरिकांनी लसीकरणाचे दुसरी मात्रा घेतली आहे. एकूण १४ लाख ४८ हजार ३५१  इतका लसीकरणाचा टप्पा महापालिकाने आतापर्यंत पार केला आहे.


कोविड रुग्ण संख्येवर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने कोविड लसीकरणासाठी शासनाच्या निर्देशानुसार "कवच-कुंडल मिशन" आणि "युवा स्वास्थ कोविड मिशन" अशा योजना महानगरपालिका क्षेत्रात राबवून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू ठेवला आहे आणि आता "हर घर दस्तक" या कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरणा पासून वंचित राहिलेल्या  नागरिकांचे सर्वेक्षण करुन त्यांच्यात लसीकरणा विषयी जनजागृती करुन त्यांचे लसीकरण करुन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. 


या "हर घर दस्तक" मोहिमे अंतर्गत मध्ये आतापर्यंत ७ हजार ६९५  नागरिकांनी कोविड लसीकरणाची पहिली मात्रा तर ३८ हजार २०६  नागरिकांनी कोविड लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली असून एकूण ४५ हजार ९०१  कोविड लसीकरण या मोहिमेअंतर्गत पार पडले आहे. तरी "हर घर दस्तक"या मोहिमेअंतर्गत आपल्या घरापर्यंत येणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य पथकास, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या आपल्या घरातील आप्तेष्टांची माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments